Shiva Rajyabhishek
शिवराज्याभिषेकोत्सव दिन
Website
जेष्ठ शुक्ल त्रयोदशी
जेष्ठ शुक्ल त्रयोदशी दिवशी शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा केला जातो. रयतेच्या या स्वतंत्र सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक झाला. मराठी संस्कृती विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय राज्याभिषेक दिनानिमित्त जाहीर केले. आपल्या स्वतंत्र राज्याची शिवशक (राज्याभिषेक शक) ही नवी कालगणना सुरु केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होन अशी मराठी लिपीतील नाणी चलनात आणली. मराठी भाषेतील अनेक महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण करून घेतले. परकीयांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीची मराठी नावे दिली. एवढ्यावरच न थांबता आपल्या लोक कल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता, संपूर्ण भारतात आणि जगभर पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशांविरूद्ध मोहिमांचा धडाका सुरु केला.